सावधान...! इव्हिनिंग वॉक करताय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:36+5:302021-04-30T04:29:36+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत इव्हिनिंग वॉकसाठी नागरिकांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे निर्देशाचे पालन न ...

सावधान...! इव्हिनिंग वॉक करताय...
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीत इव्हिनिंग वॉकसाठी नागरिकांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे निर्देशाचे पालन न केल्याने बुधवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात इव्हिनिंग वॉक करणाऱ्या १८ जणांवर पोलीस व महापालिकेच्या पथकांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत सायकलिंग करणाऱ्यांचाही समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी पोलीस कर्तव्य बजावत आहेत; पण नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे शासकीय विश्रामगृह परिसरात इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत डायल ११२ पथक महापालिका कर्मचारी यांनी ही संयुक्तपणे केली. पथकात सहायक फौजदार संदीप जाधव, पोलीस अंमलदार विष्णू पाटील, संजय सोळंकी, सुमित पाटील, लखन पाटील, विनोद मनुगडे, दीपक झांजगे, संग्राम खाडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी अशोक खामकर, प्रशांत घोरपडे यांचा समावेश होता.