सावधान! व्यवसाय बदलतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2015 00:33 IST2015-08-27T00:33:24+5:302015-08-27T00:33:24+5:30

चकोर गांधींचे व्याख्यान : लोकमत, जैन इंटरनॅशनल, कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजन

Be careful! Changing business ... | सावधान! व्यवसाय बदलतोय...

सावधान! व्यवसाय बदलतोय...


कोल्हापूर : ‘लोकमत’ आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन, कोल्हापूर चॅप्टर यांच्या वतीने पुण्याचे प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ चकोर गांधी यांचे शनिवारी (दि. २९) यशवंतराव चव्हाण सभागृह,
राजाराम कॉलेज येथे दुपारी चार वाजता ‘सावधान! व्यवसाय बदलतोय’ या विषयावर प्रकट व्याख्यान होणार आहे.
स्पर्धेच्या युगात हमखास यशाची गुरुकिल्ली देणाऱ्या या व्याख्यानात दोन पिढ्यांनी एकत्र व्यवसाय कसा करावा, महिलांचा व्यवसायातील यशस्वी सहभाग व नवनवीन व्यवसाय, त्यातील संधी, व्यवसायातील वाढ, मनुष्यबळ व्यवस्थापन यासंबंधी विस्तृत अशी माहिती या व्याख्यानाद्वारे ते देणार आहेत. व्यवस्थापनातील प्रसिद्ध तज्ज्ञ असणाऱ्या गांधी यांचा जन्म बेळगाव (कर्नाटक) येथे झाला असून, त्यांनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन या शाखांतून शिक्षण घेतले आहे. २००३-०४ च्या ‘व्यापार भूषण’ या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांनी उद्योग जगातील विविध पदांवर २० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ‘कॅलिबेरेटेड फॅक्स रोल’ या उपकरणाचा पेटंट त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. लिओ क्लब, एफ.जे.ई.एल. यासारख्या विविध संस्थांचे ते सदस्य आहेत. आजपर्यंत त्यांनी पंचवीसहून अधिक संस्थांमध्ये व्यवस्थापनातील सल्ला देण्याचे काम केले आहे. व्याख्यानात दिली जाणारी माहिती व्यापारी, उत्पादक, महिला उद्योजक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, पासेस वामाज साडी सेंटर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, पार्श्व इन्व्हेस्टमेंट, राजीव गांधी पुतळ्याजवळ, सेंट्रल बस स्टँडशेजारी, कोल्हापूर, सॅमसंग प्लाझा, शाहू स्टेडियम, कोल्हापूर व लोकमत कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध केले आहेत.
 

Web Title: Be careful! Changing business ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.