शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

स्वच्छतेचा जागर व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:56 IST

भारत पाटील ‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ...

भारत पाटील‘गावांचे जरी उत्तम नसले! तरी देशाचे भविष्य ढासळले’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील पंक्तीप्रमाणे खरंच अस्वच्छता ही गंभीर समस्या बनली आहे आणि म्हणूनच स्वच्छतेचा जागर व्हावा यासाठी सर्व स्तरांवरून विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. आपल्या देशात अनेक लोक, संस्था, शासन व गावांनी स्वच्छतेच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणजे ग्रामीण विकासाला कलाटणी देणारे ठरले आहे. उ’ींल्ल’्रल्ली२२ ्र२ ल्ली७३ ३ङ्म ॠङ्म’्रिल्ली२२ या महात्मा गांधीजी यांच्या घोषवाक्यास अनुसरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी नेमकं मर्म ओळखून सर्व यंत्रणा स्वच्छतेच्या कार्याला लावली आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर व सार्वजनिक स्वच्छतेलादेखील महत्त्व दिले पाहिजे. तरंच आपले शारीरिक व सामाजिक स्वास्थ्य टिकणार आहे आणि यासाठी आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. जसे वैयक्तिक स्वच्छतेमध्ये दररोज स्नान करणे, दात घासणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, नखे काढणे, केसांची नीगा, घर स्वच्छता, परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. तसेच सार्वजनिक स्वच्छता पण ग्रामसमृद्धीमधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यातील काही बाबी पुढीलप्रमाणे : १) पाणी व्यवस्थापन - ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती सक्षम असावी, गावांचे ६ं३ी१ अ४्रिि३ करावे, जलस्रोत परिसर स्वच्छ व शुद्ध ठेवावा, ळउछ चा नियमित वापर, पाणी गळती थांबविणे, शुद्ध पाणी नियमित पुरविणे. २) सांडपाणी व्यवस्थापन : गावांच्या व शहरांच्या सांडपाण्याची दुरवस्था झाल्यामुळे आपले ओढे व नद्या आपणच गटारगंगा केल्या आहेत. आपले जलस्रोत दूषित झाले आहेत. यासाठी शोषखड्डे, बंदिस्त गटारे, परसबाग, सांडपाण्याची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे, त्याचा शेतीसाठी पुनर्वापर. ३) शौचालय/मुतारी व्यवस्थापन : घरोघरी शौचालय व नियमित वापर. सार्वजनिक ठिकाणी पुरेशी शौचालय व मुतारी व्यवस्था असावी. याचे स्वच्छता व्यवस्थापन असावे. शाळा, कॉलेज, बसस्थानके, भाजी मंडई याठिकाणी वॉश बेसीन व पाण्याची सोय असावी. सार्वजनिक शौचालयांमधील मैला विल्हेवाट करून बायोगॅस व खतनिर्मिती करता येते. ४) घनकचरा व्यवस्थापन : सध्या कचरा ही सर्वांत मोठी डोक्याला त्रास देणारी समस्या झाली आहे. घरोघरी कचराकुंडी व ओला, सुका व प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व विल्हेवाटची सवय असावी. कचरा उचलून नेण्याची सातत्यपूर्ण व स्वतंत्र व्यवस्था असावी. कचºयाचे नँडेप गांडूळ खत, कम्पोस्ट खत निर्मिती करणे. मेडिकल कचºयाची शास्रशुद्ध विल्हेवाट लावणे. ५) अपारंपरिक ऊर्जेचा वापर : सौर चूल, सौर पथदिवे, सोलर लाईट, सोलर वॉटर हिटर याचा प्रभावी वापर, प्लास्टिक बंदी, निर्र्धूर चूल व बायोगॅसचा सर्रास वापर आवश्यक. ६) पर्यावरण संवर्धन : वृक्षलागवड, जतन, संवर्धन करणे. टँगिग करून वृक्षलागवड नोंदवही ठेवणे. गावातील जलस्रोत बळकट करणे. पाणी आडवा..जिरवा, छतावरील पावसाचे पाणी, शिवकालीन पाणी साठवण तंत्राचा वापर. ७) घर/गाव/परिसर स्वच्छता : गावातील रस्ते, गल्ल्या, अंगण, सार्वजनिक ठिकाणे यांचे सतत स्वच्छता नियोजन. अन्नधान्य साठवणूक व पिण्याचे पाणी शास्रशुद्ध वापर, शालेय स्वच्छता इ. घटक महत्त्वाचे आहेत. वरील सर्व विषयांसंबंधी आपणाला नियोजनबद्ध काम केल्याशिवाय आपली गावं कधीही सुंदर, देखणी व निरोगी होणार नाहीत. अंग मेहनत, श्रमदान व स्वयंशिस्त या बाबी आपणाला अंगीकाराव्याच लागतील. ‘आपलं मनं स्वच्छ, तर आपलं घर स्वच्छ ’, ‘आपलं घर स्वच्छ, तरंच आपलं गांव स्वच्छ’ ही मानसिकता आपल्या अंगी यायलाच हवी. आपण सारे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वस्तू व पैसा दान देत असतो; परंतु आता आपला देश व आपला गाव आपल्याकडे श्रमाचे दान मागत आहे. ते ही आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच. आपण श्रमदान केले तरंच आपली गांव स्वच्छ होणार आहेत. समृद्ध होणार आहेत. किमान महिन्यातील एक दिवस आपला काही वेळ गाव समृद्ध करण्यासाठी देता येईल का? श्रमदान करता येईल का? असा फक्त विचार करून चालणार नाही, तर या कार्यात मनापासून सहभागी व्हावं लागेल. शालेय मुलांमध्ये स्वच्छता, स्वयंशिस्त, श्रमसंस्कार, सिव्हील सेन्स आणावेच लागतील तरंच खेडी आपलं रूपडं बदलून निरोगी व सुदृढ होतील.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्तीचळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)