सामाजिक उपक्रमात सक्रिय व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:27+5:302021-07-14T04:28:27+5:30
येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्यावतीने शहरातील सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अशोककुमार पाटील प्रमुख उपस्थित ...

सामाजिक उपक्रमात सक्रिय व्हा
येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्यावतीने शहरातील सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अशोककुमार पाटील प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रवळनाथचे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
प्राचार्य डॉ. अशोककुमार पाटील म्हणाले, वित्तीय संस्था असूनही सामाजिक बांधिलकी जपण्याची रवळनाथची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. पारदर्शक कारभारातून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या अशा संस्थांचीच समाजाला खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. माणिक घुमाई, प्रा. डॉ. सुभाष शेळके, प्रा. डॉ. सुभाष हसबे, शिवाजी कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत शाखाध्यक्ष प्राचार्य डॉ. के. एस. पाटील यांनी केले. फोटो - १३०७२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रवळनाथ संस्थेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. अशोककुमार पाटील, प्रा. डॉ. दत्ता पाटील, प्रा. माणिक घुमाई, महावीर चौगुले, प्राचार्य डॉ. के. एस. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.