बावड्याची दिंडी पंढरपूरच्या वाटेवर
By Admin | Updated: July 20, 2015 00:12 IST2015-07-20T00:11:26+5:302015-07-20T00:12:31+5:30
विटू नामाचा गजर : २०० वारकऱ्यांचा सहभाग

बावड्याची दिंडी पंढरपूरच्या वाटेवर
कसबा बावडा : कसबा बावड्यातून सुमारे दोनशेहून अधिक वारकऱ्यांच्या दिंडीने रविवारी पायी पंढरपूरला प्रस्थान झाले. दिंडी श्री गुरू ह.भ.प. तात्यासो वास्कर महाराज यांच्या उपस्थितीत निघाली. दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुकाराम महाराज मंडप येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.येथील तुकाराम महाराज मंदिराचे अध्यक्ष श्रीहरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या दिंडीचे प्रस्थान झाले. मिरज, केरेवाडी, पाचेगाव, जुनोनी, सांगोला, पंढरपूर या मार्गाने ही दिंडी मार्गस्थ होते. २० ते २५ कि.मी. अंतर दररोज दिंडीतील वारकरी चालतात. या दिंडीत दोन ट्रॅक्टर, दोन कार, एक अॅपेरिक्षा, आदी वाहने साहित्य वाहून नेण्यासाठी तैनात केली आहेत.निवृत्ती माने, बाजीराव कारंडे, तुकाराम पाटील, भिकाजी वाडकर, सर्जेराव मालेकर, यशवंत पाटील, राजू पाटील, विजय चव्हाण, दशरथ ठोंबरे, हंबीरराव पाटील, नामदेव सुतार, नामदेव पाटील, भरत चौगुले, दिलीप पाटील यांच्यासह वारकऱ्यांनी विठ्ठरायाच्या भजनांचा गजर करीत दिंडीला सुरुवात केली. दिंडीला मोठ्या भक्तिभावाने नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. ( प्रतिनिधी )