बावडा श्रीराम संस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:57+5:302021-09-27T04:24:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : येथील श्रीराम विकास सेवा संस्थेला यंदा ३९ लाख १४ हजार रुपयांचा निव्वळ नफा ...

बावडा श्रीराम संस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : येथील श्रीराम विकास सेवा संस्थेला यंदा ३९ लाख १४ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्था यंदा सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती चेअरमन हरी पाटील यांनी ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. संस्थेच्या मुख्यालयात ऑनलाईन सभा झाली.
चेअरमन हरी पाटील म्हणाले, यंदाही संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात आहेत. लेखा परीक्षणामध्ये संस्थेस ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. संस्थेच्या ठेवीमध्ये भरघोस वाढ होऊन त्या ३१ कोटी ७४ लाख झाल्या आहेत. संस्थेने २१ कोटी ७२ लाखाचे सभासद कर्ज दिले आहे. संस्थेचा एकूण व्यवहार २०८ कोटींच्या वर गेला आहे.
प्रारंभी संचालक विलास पिंगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक राजीव चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. व्यवस्थापक शरदचंद्र उलपे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. मंजूर मंजूरच्या घोषणेत सर्व विषयांना सभासदांनी यावेळी मंजुरी दिली. उपसभापती संतोष पाटील यांनी आभार मानले.
यावेळी संचालक प्रशांत पाटील, प्रमोद पाटील, राजीव चव्हाण, मदन जामदार, प्रवीण लाड, धनाजी गोडसे, संतोष ठाणेकर, संजय केंबळे, शिवाजी चौगले, विलास पिंगळे, कुंडलिक परीट, सुधाकर कसबेकर, जया उलपे, वनिता बेडेकर, नंदिनी रणदिवे, तसेच चार्टर्ड अकाउंटंट सुनील नागावकर, आदी उपस्थित होते.
फोटो : कसबा बावडा येथील श्रीराम विकास सेवा संस्थेच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन हरी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्हा. चेअरमन संतोष पाटील, राजीव चव्हाण, सुनील नागावकर, सर्व संचालक उपस्थित होते.
(फोटो - रमेश पाटील, कसबा बावडा )