दहा हजार कलावंतांची लढाई केली सोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:11+5:302021-08-20T04:30:11+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील लोककलावंतांना बालाजी कलेक्शन राजारामपुरी येथे या वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोककला जिवंत रहावी यासाठी लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचीही काळजी ...

दहा हजार कलावंतांची लढाई केली सोपी
कोल्हापूर जिल्ह्यातील लोककलावंतांना बालाजी कलेक्शन राजारामपुरी येथे या वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोककला जिवंत रहावी यासाठी लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचीही काळजी घेण्याची गरज होती. याच उद्देशाने राज्यातील लोककलावंतांची जबाबदारी घेऊन त्यांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस संग्राम शिर्के, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, संतोष दारकुंडे, रजनीश राणे, पल्लवी फाऊंडेशनचे संस्थापक भाऊ कोरगावकर, बालाजी कलेक्शनचे संस्थपक प्रशांत पोकळे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विवेक पवार, कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, दीपक भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते हर्षल सुर्वे, ॲड. शिवप्रसाद वंदुरे पाटील, बाबा इंदूलकर, प्रशांत पोकळे उपस्थित होते. कोरोना योद्धे प्रिया पाटील, चैतन्य अष्टेकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी बाबा इंदूलकर म्हणाले, प्रसारमाध्यमे नसताना लोककलावंतांच्या माध्यमातूनच जनजागृती करण्यात आली. समाजाला अंधारातून उजेडाकडे नेण्याची कामगिरी या लोककलावंतांनी केली आहे. लोककलावंतांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निखिल मोरे, विवेक पवार यांनी सांगितले.
१९०८२०२१ कोल बालाजी कलेक्शन
कोल्हापुरात बालाजी कलेक्शनच्या सहकार्याने लोककलावंतांना मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.