शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची सवारी..पंचगंगेच्या विहारी; कोल्हापुरात नदी घाटावर रंगला अवभृत स्नान सोहळा 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 12, 2023 19:31 IST

कोल्हापूर : भालदार चोपदार, वाजंत्री, घोडेस्वार असा शाही लवाजमा, अंबा माता की जयचा गजर आणि भाविकांच्या गर्दीत शनिवारी करवीर ...

कोल्हापूर : भालदार चोपदार, वाजंत्री, घोडेस्वार असा शाही लवाजमा, अंबा माता की जयचा गजर आणि भाविकांच्या गर्दीत शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा रंगला. देवधर्म, धार्मिक अनुष्ठानाच्या पवित्र अधिक महिन्यात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पंचगंगा नौका विहाराचा नेत्रसुखद सोहळा झाला. सृष्टीचा सांभाळ करणारी अंबाबाई आणि कोल्हापुरकरांची जीवनदायिनी पंचगंगा भेटीचा हा सोहळा भाविकांनी डोळ्यात साठवला.तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाकडून मंदिरात धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. याची सांगता शनिवारी देवीच्या अवभृत स्नान सोहळ्याने झाली. श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती वर्षातून फक्त तीनदा मंदिराबाहेर येते. कोल्हापुरकरांना आपल्या वरदहस्ताचे दान देत ती मंदिरात परतते. पण यंदा अवभृत स्नानाच्या निमित्ताने अंबाबाई पंचगंगेच्या भेटीला गेली. सकाळी साडे दहा वाजता शाही लव्याजम्यानिशी तसेच फुलांनी सजवलेल्या पालखीत देवीची उत्सवमूर्ती विराजमान झाली. महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्गे पंचगंगा घाटावर पालखीचे आगमन झाले. येथे देवीचे पूजन झाले. पंचगंगेवला माता मानतो त्या नदीचे पूजन झाले, नदीची ओटी भरण्यात आली. त्यानंतर अंबाबाईचा अवभृत स्नान सोहळा झाला. या नंतर बोटीतून देवीचा पंचगंगा नौका विहार झाला. त्यानंतर पालखी याच मार्गे दुपारी साडेतीन वाजता मंदिरात आली. श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर व मयूर मुनिश्वर यांनी धार्मिक विधी केले. यावेळी हजारो भाविक पंचगंगा काठावर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरriverनदी