विधी अभ्यासक्रमाच्या तोंडी परीक्षेसाठी दहा विद्यार्थ्यांची बॅॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:59+5:302021-07-03T04:15:59+5:30
भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये ऑनलाईन सबमिशन होत असताना देखील तोंडी परीक्षेसाठी ५० विद्यार्थ्यांना एकत्रित बोलविण्यात येत असल्याची ...

विधी अभ्यासक्रमाच्या तोंडी परीक्षेसाठी दहा विद्यार्थ्यांची बॅॅच
भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये ऑनलाईन सबमिशन होत असताना देखील तोंडी परीक्षेसाठी ५० विद्यार्थ्यांना एकत्रित बोलविण्यात येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे केली. त्यावर या परीक्षेसाठी एका बॅचमध्ये दहा विद्यार्थी असावेत, अशी मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे कुलसचिव नांदवडेकर यांच्याकडे केली. त्याची दखल घेत त्यांनी महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे युवासेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी सांगितले. यावेळी सनराज शिंदे, वैभव जाधव, मंगेश चितारे, चैतन्य देशपांडे उपस्थित होते.
फोटो (०२०७२०२१-कोल-युवासेना निवेदन) : कोल्हापुरात शुक्रवारी विधी अभ्यासक्रमाच्या तोंडी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतच्या मागणीचे निवेदन युवासेनेच्या शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना दिले.
020721\02kol_3_02072021_5.jpg