बस्तवाडच्या शेतकऱ्याने केली खरेदीसव्वा लाखाची म्हैस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:05 IST2018-11-22T00:04:17+5:302018-11-22T00:05:26+5:30
कुरुंदवाड : दूध संघाकडून गाय दूध नाकारत असल्याने व गायीचे दूध दरही उतरल्याने म्हैस दुधाला महत्त्व आल्याने म्हशींचे दर ...

बस्तवाडच्या शेतकऱ्याने केली खरेदीसव्वा लाखाची म्हैस
कुरुंदवाड : दूध संघाकडून गाय दूध नाकारत असल्याने व गायीचे दूध दरही उतरल्याने म्हैस दुधाला महत्त्व आल्याने म्हशींचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना येथील पिंटू नरके या म्हैस व्यापाºयाने महिसाना जातीची म्हैस तब्बल एक लाख २५ हजार रुपयांना विकली. बस्तवाड (ता. शिरोळ) येथील महावीर मगदूम या शेतकºयाने ही म्हैस खरेदी केली. या म्हशीला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
गायीच्या दुधाचे प्रमाण वाढल्याने व दूध पावडर करणे दूध संघांना परवडत नसल्याने सर्वच दूध संघ गाय दूध नाकारत आहेत. शिवाय दुधाचे दरही कमी केल्याने बाजारात गायींच्या किमती उतरल्याने म्हशींना महत्त्व आले आहे.
एरव्ही तीस ते चाळीस हजाराला येणारी म्हैस आता पाऊण लाखावर पोहोचली आहे. कर्नाळी, पंढरपुरी, महिसाना अशा जातिवंत
म्हशींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. येथील म्हैस व्यापारी पिंटू नरके यांनी तीन दिवसांपूर्वी पाकिस्तान सीमेवरील कट्टा भागातून महिसाना जातीची म्हैस आणली होती. ही म्हैस तब्बल एक लाख २५ हजार रुपये किंमत देऊन बस्तवाड येथीस महावीर मगदूम यांनी खरेदी केली. म्हैस दररोज अंदाजे अठरा लिटर दूध देईल, असा विश्वास
मगदूम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.