जयसिंगपूर येथे बॅरिकेट लावून केला बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:07+5:302021-04-28T04:25:07+5:30
जयसिंगपूर : शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे दक्षतेचे उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मंगळवारी धडक मोहीम राबविली. भाजी व ...

जयसिंगपूर येथे बॅरिकेट लावून केला बाजार बंद
जयसिंगपूर : शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे दक्षतेचे उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मंगळवारी धडक मोहीम राबविली. भाजी व फळ विक्री विक्रेत्यांवर निर्बंध घालून शहरातील दहावी ते तेरावी गल्लीपर्यंत बॅरिकेट लावून बाजार बंद केला. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाने दिला असून शहरात फिरून भाजीपाला विकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरांमध्ये वाढती रुग्णसंख्या चितेंची बाब बनली आहे. गल्ली क्रमांक १० ते १३ या ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यां ची गर्दी होत असल्याने या परिसरात नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पालिकेने तातडीने ऑनलाइन सभा घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी प्रतिबंध करण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी पालिका कर्मचाऱ्यांनी भाजी व फळ विक्रेत्यांना मज्जाव करून बॅरिकेट लावून परिसर सील केला. एका जागेवर न थांबता फिरून विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. शिवाय भाजी व फळ विक्रेत्यांची ॲन्टिजेन तपासणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
फोटो ओळ: जयसिंगपूर येथे दहावी ते तेरावी गल्ली परिसर सिल करून भाजी विक्रेत्यांना मज्जाव करण्यात आला.