‘बारामती हरिकन्स’ कोल्हापूरच्या पाटलांकडे
By Admin | Updated: May 13, 2015 23:39 IST2015-05-13T23:39:04+5:302015-05-13T23:39:04+5:30
महाकबड्डी : दोन्ही संघ लढतीसाठी सज्ज

‘बारामती हरिकन्स’ कोल्हापूरच्या पाटलांकडे
कोल्हापूर : प्रो-कबड्डीच्या धर्तीवर सुरू होत असलेल्या महाकबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या दीपक पाटील व रघुनाथ पाटील यांनी बारामती हरिकन्स हा संघ विकत घेतला आहे. एकवीरा असोसिएटस्च्या अधिपत्याखाली मुलींचा संघ या दोघांनी, तर मुलांचा संघ दादासाहेब आव्हाड यांनी घेतला.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या सहकार्याने होत असलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी लीगमध्ये आठ मुले व आठ मुलींच्या संघांचे लिलाव करण्यात आले. त्यामध्ये दीपक पाटील व रघुनाथ पाटील यांनी ‘बारामती हरिकन्स’ हा मुलांचा संघ विकत घेऊन पुण्याच्या नेहा घाडगे या खेळाडूवर सर्वांत जास्त म्हणजे दोन लाख अठ्ठावीस हजारांची बोली लावून तिला आपल्या संघात समविष्ट केले आहे. याशिवाय रिबेका गवारे (रेल्वे), स्नेहल शिंदे (पुणे), मोनिका शिंदे (रेल्वे), पायल घेवारी, पूनम तांबे या राष्ट्रीय कबड्डीपटूंना चांगली बोली लावून त्यांनी तगडा संघ उभा केला आहे.
ही स्पर्धा १५ मे ते ७ जूनदरम्यान होणार आहे. दीपक व रघुनाथ पाटील हे दोघे शिरोली पुलाची येथे आयडियल इंग्लिश स्कूलचे व शिरोली येथे कबड्डी प्रशिक्षण अकॅडमी येथे शारीरिक शिक्षक म्हणून काम करतात.
दोन्ही संघांचे सराव शिबिर गुरुकुल अकॅडमी, पेठवडगाव येथे दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
संघ असा :
मुली : नेहा घाडगे, मोनिका शिंदे, रिबेका गवारे, स्नेहल शिंदे, पायल घेवारे, पूनम तांबे, लविना गायकवाड, रितू वर्णे, स्मिता पांचाळ, पूजा जाधव, प्रशिक्षक दीपक पाटील.
मुले : रोहित पार्टे, शेखर तटकरे, मोबीन शेख, विपुल मोकल, पंकज घोडके, दिग्विजय कौंदाडे, अमित जमदाडे, योगेश मोरे, रोहित ढेंगे, संकेत चव्हाण, सुनील दुबिले, बलराम पायघण, प्रशिक्षक रवींद्र हलके.