वटवाघळांवर काळरात्र--वळवाने उडवली दैना जिल्ह्यात साडेबारा लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 7, 2015 00:38 IST2015-05-07T00:38:43+5:302015-05-07T00:38:58+5:30
पर्यावरणप्रेमी सरसावले : ९३ वटवाघळांचा मृत्यू; शेकडोंना जीवदान

वटवाघळांवर काळरात्र--वळवाने उडवली दैना जिल्ह्यात साडेबारा लाखांचे नुकसान
कोल्हापूर : वादळी पावसामुळे टाउन हॉल येथील पिंपळाच्या झाडाची फांदी मंगळवारी रात्री तुटून जमिनीवर पडली. त्यामुळे या फांदीवर विसावलेल्या ९३ वटवाघळांचा जमिनीवर आपटून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उद्यानात फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व सजग नागरिकांना समजली. त्यांनी तत्काळ पडलेल्या एकेक वटवाघळाला परत झाडावर उडविण्याचा प्रयत्न केला. यात काही वटवाघळे पुन्हा झाडावर विसावली, तर ९३ वटवाघळांचा खाली पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले.
बुधवारी सकाळी टाऊन हॉल बागेत वटवाघळे मृत झाल्याची माहिती समजताच नागरिकांनी तत्काळ वन विभाग व अग्निशमन दलाला ही बाब कळविली. मात्र, नेहमीप्रमाणे वन विभागाचे कर्मचारी वेळाने आले, तर अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली. वटवाघळे सस्तन, निशाचार पक्षी असल्याने त्यांना फक्त रात्रीचे दिसते. त्यामुळे ती तशीच जमिनीवर पडून होती. फिरायला आलेल्या पर्यावरणप्रेमी व अग्निशमन दलाच्या जवानांनी दोनशेहून अधिक वटवाघळांना जवळील छोट्या झाडावर सुखरूप नेऊन सोडले; तर अन्य ९३ मृत वटवाघळांना अग्निशमन दल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. यावेळी पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, करवीरचे वनपाल पी. डी. घोडके, आर. के. देसा यांनी येऊन पाहणी केली; तर वाठार येथील राजू कांबळे हे करवीरचे तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त आले होते. त्यांनीही अनेक वटवाघळांना सुखरूप दुसऱ्या झाडावर चढविले.
दरम्यान, सस्तन पक्षी असलेल्या वटवाघळाचे रक्त गरम असल्याने याचा वापर औषध म्हणून अर्धांगवायू व संधिवातावर केला जातो, या गैरसमजापोटी अनेक वटवाघळे मृत झाल्याचे समजल्यानंतर अनेकजण टाउन हॉल उद्यानात पोती घेऊन आले होते. मृत पडलेल्या वटवाघळांना उचलून पोत्यात घालण्याच्या तयारीत असलेल्या या नागरिकांना पर्यावरणप्रेमी व उद्यान कर्मचारी, वन, अग्निशमन दलाचे जवान यांनी हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचारी व या नागरिकांत वादावादी झाली. कर्मचाऱ्यांनी या नागरिकांना पिटाळून लावले.
मन पिळवटून टाकणारे दृश्य
जमिनीवर आपटल्याने अनेक वटवाघळांचा मृत्यू झाला. यावेळी वटवाघळाच्या पाच माद्या आपल्या पिलांना पंखांखाली घेऊन पडल्याचे दिसून आले. यात मादी पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, पंखांखाली असलेली पाच पिल्ले आईचे दूध पिताना जिवंत दिसून आली. त्यांनाही वाचविण्यात यश आले.
१०२ खांब भुईसपाट
वीज कंपनीला ‘शॉक’ : कर्मचाऱ्यांनी रात्रभर केले काम
अग्निशमन दलाची तारांबळ
शेकडो फोन : झाडे कोसळण्याची शहरात मालिकाच
शहरात पाणीपुरवठा ठप्प; टँकरने पुरवठा
बाजार समितीत चिखलातच झाले कांदा सौदे