बापूजी साळुंखे पथ नामकरण सोहळा उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:05+5:302020-12-31T04:25:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डाॅ. बापूजी साळुंखे पथ असा नामकरण सोहळा उद्या, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता महापालिकेच्यावतीने ...

Bapuji Salunkhe Path naming ceremony tomorrow | बापूजी साळुंखे पथ नामकरण सोहळा उद्या

बापूजी साळुंखे पथ नामकरण सोहळा उद्या

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डाॅ. बापूजी साळुंखे पथ असा नामकरण सोहळा उद्या, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शिक्षणमहर्षी डाॅ. बापूजी साळुंखे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने कोल्हापूर महापालिकेच्यावतीने ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हाॅल मार्ग ते एस.पी. ऑफिस चौक या मागार्तील रस्त्याचे नामकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री पाटील यांच्यासह माजी महापौर निलोफर आजरेकर, महापालिका आयुक्त डाॅ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर सरिता मोरे, स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे यांनी केले आहे.

फोटो : ३०१२२०२०-कोल-बापूजी साळुंखे

Web Title: Bapuji Salunkhe Path naming ceremony tomorrow