चंदगडमध्ये उत्साहात बाप्पाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:22+5:302021-09-11T04:24:22+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत शांततेत बाप्पाचे स्वागत केले. चंदगड, नागणवाडी, अडकूर, कानूर, हलकर्णी, करंजगाव, धुमडेवाडी, माणगाव, मजरे कारवे, ...

Bappa's arrival in Chandgad with enthusiasm | चंदगडमध्ये उत्साहात बाप्पाचे आगमन

चंदगडमध्ये उत्साहात बाप्पाचे आगमन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत शांततेत बाप्पाचे स्वागत केले. चंदगड, नागणवाडी, अडकूर, कानूर, हलकर्णी, करंजगाव, धुमडेवाडी, माणगाव, मजरे कारवे, कोवाड, कुदनूर, कालकुंद्री, तुर्केवाडी, शिनोळी, तुडये, देवरवाडी या गावांसह तालुक्यातील सर्वच गावांत घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे स्वागत झाले.

शुक्रवारीही गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी चंदगड, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, कोवाड, शिनोळी फाटा या परिसरात मोठी गर्दी झाली होती.

बँकांच्या सुटीमुळे एटीएमसमोर रांगा

शुक्रवारपासून सलग तीन दिवस सर्वच बँकांना सुट्टी आहे. त्यातच चाकरमानी तालुक्यात दाखल झाले असून त्यांच्यासह सर्वांनाची बँकांच्या सुट्टीमुळे गैरसोय झाली. अनेक एटीएमसमोर रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाल्या.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये भरली बाप्पांची शाळा

चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या माती व शाडूच्या गणेशमूर्तींची अनोखी शाळा भरली. या अनोख्या शाळेला भेट देऊन उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वेळी प्राचार्य आर. आय. पाटील व शिक्षक उपस्थित होते.

फोटो ओळी : चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाप्पाच्या अनोख्या शाळेचे पाहणी उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे यांनी केली. यावेळी प्राचार्य आर. आय. पाटील उपस्थित होते.

क्रमांक : १००९२०२१-गड-०५

Web Title: Bappa's arrival in Chandgad with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.