शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा चालले आपल्या गावाला, घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:09 IST

गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.

ठळक मुद्देबाप्पा चालले आपल्या गावालाघरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.ज्या गणरायाची भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्या गणपतीचे आगमन झाले. यंदा कोरोनाचे संकट दारादारांत असताना देवाच्या स्वागतात आणि धार्मिक विधीत मात्र कोणतीही कमतरता ठेवू न देता कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. घरोघरी सुंदर आरास सजली.

आपापल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला. बाप्पांचा पाच दिवस भक्तांच्या घरी छान पाहुणचार झाला. गणपतीपाठोपाठ गौरी आणि शंकरोबाही आले. या परिवार देवतांचे पूजन झाले. पंचपक्वान्नांचा नैवेद्य झाला. आज, गुरुवारी सहाव्या दिवशी भाविकांना जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणपतीबरोबरच गणोबा, ज्येष्ठा गौरी आणि शंकरोबाचेही विसर्जन झाले.यंदा कोल्हापुरात गणेश विसर्जन काहिलीतसकाळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर निलोफर आजगेकर यांच्या हस्ते गणेशाची आरती करून मिरजकर तिकटी येथून गणेश विसर्जनाला सुरवात झाली. बालगोपाल तालिम येथे मान्यवरांच्या हस्ते काहिलीमध्ये पंचगंगेचे पाणी ओतून विसर्जनाला सुरवात झाली आहे.दरवर्षी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक येऊन आपापल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने नागरिकांना आपापल्या भागातच गणेशमूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले. त्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काहिली व विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली. कोल्हापूर शहरासाठी महापालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विसर्जनाचे नियोजन करण्यात आले.घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीसह अन्य तलावांत गणेशमूर्ती विसर्जनाला मनाई केली आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम या तलावांत प्रवेशबंदी करण्यात आली होती, यामुळे भाविकांनी विसर्जन कुंडांतच मूर्तींचे विसर्जन केले.घरगुती गौरी-गणपती विसर्जनाला आज, गुरुवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. विसर्जन करताना गर्दीतून न कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीत होती.

गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या वतीने ठेवलेल्या विसर्जन कुंडांचा वापर करत प्रशासनाला सहकार्य केले. येथे विसर्जित मूर्ती तसेच मूर्तिदानातून जमा होणाऱ्या मूर्तींचे विधीवत विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.नदी, तलाव परिसरात बॅरिकेडिंगपंचगंगा नदीघाटावर जाणारा मार्ग, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ या तलावांच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. विसर्जनासाठी नदी, तलावाच्या जाण्यास सर्वांना प्रतिबंध करण्यात आले. भाविकांनीहि आपापल्या प्रभागांत विसर्जन कुंडांत गणेशमूर्ती विसर्जित केल्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण