बनूबाई वास्कर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:09+5:302021-04-30T04:30:09+5:30
कोल्हापूर : मोरेवाडी (ता. करवीर) येथील बनूबाई भैरू वास्कर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे ...

बनूबाई वास्कर यांचे निधन
कोल्हापूर : मोरेवाडी (ता. करवीर) येथील बनूबाई भैरू वास्कर (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या शिवाजी विद्यापीठाच्या सेवानिवृत्त कर्मचारी होत्या. त्या माजी उपमहापौर विलास वास्कर, मोरेवाडीचे माजी सरपंच संजय वास्कर यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा वास्कर यांच्या सासू होत.
मनोहर गुर्जर
कोल्हापूर : मोहिते पार्कातील मनोहर केशव गुर्जर (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिवपुत्राप्पा वाली
कोल्हापूर : निपाणी (ता. चिकोडी, बेळगाव) येथील मेट्रो कोल्ड्रिंक हाऊसचे मालक शिवपुत्राप्पा निजलिंगाप्पा वाली (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे, नातसुना, परतवंडे असा परिवार आहे.