बॅँक समन्वयकांची खरडपट्टी

By Admin | Updated: June 10, 2016 00:52 IST2016-06-10T00:50:24+5:302016-06-10T00:52:05+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : पीक कर्ज वाटपाचे २६८८ कोटींचे उद्दिष्ट

Bank scrutiny of co-coordinators | बॅँक समन्वयकांची खरडपट्टी

बॅँक समन्वयकांची खरडपट्टी

कोल्हापूर : गेल्या वर्र्षी इंडियन बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, युको बँक यांचे पीक कर्ज वाटपाचे आणि सीडी रेशोचे काम असमाधानकारक झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी उपस्थित बॅँक समन्वयकांची चांगलीच खरडपट्टी काढली. पीक कर्ज वाटप हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय असून यापुढे कर्जवाटपाबाबत काम सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँक समन्वयकांना दिला. यंदा जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना बँकांमार्फत २६६८ कोटी रुपयांचा पीक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने जिल्ह्यास दिल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या जिल्हा समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराटे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक नंदू नाईक, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, प्रकल्प संचालक डॉ. हरीश जगताप, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक एम. जी. कुलकर्र्णी यांच्यासह सर्व बॅँकांचे जिल्हा समन्वयक व अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांमार्फत २६८८ कोटी रुपयांचा पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. पीक कर्ज वाटपापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, या दृष्टीने सर्व बँकांनी आणि शासकीय यंत्रणांनी कृती कार्यक्रम निश्चित करून पीक कर्जाचे वाटप करावे. गतवर्र्षी जिल्ह्यास पीक कर्जासाठी १७८८ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्चअखेर ते पूर्ण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Bank scrutiny of co-coordinators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.