बँक ऑफ इंडियाचा ‘केडीसीए’शी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:20+5:302021-09-21T04:27:20+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील गरजू औषध विक्रेत्यांसाठी आकर्षक व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँक ऑफ इंडिया व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ...

Bank of India's agreement with KDCA | बँक ऑफ इंडियाचा ‘केडीसीए’शी करार

बँक ऑफ इंडियाचा ‘केडीसीए’शी करार

कोल्हापूर : जिल्ह्यातील गरजू औषध विक्रेत्यांसाठी आकर्षक व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँक ऑफ इंडिया व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोशिएन (केडीसीए) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. अत्यंत कमी वेळेमध्ये गरजूंना जास्तीत-जास्त कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँक ऑफ इंडिया नेहमी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही बँक ऑफ इंडिया ‘एसएमई’ सिटी सेंटरचे सहायक महाप्रबंधक राजेन्द्र कुलकर्णी यांनी दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक हेमंत खेर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी ढेंगे, सचिव अशोक बोरगावे, बँकेचे कोल्हापूर शाखेचे सहायक महाप्रबंधक इलाही सय्यद, ‘एसएमई’ सिटी सेंटरचे मुख्य प्रबंधक कैलास चौधरी आणि विपणन अधिकारी सुनील गायकवाड उपस्थित होते.

फोटो ओळी : बँक ऑफ इंडिया व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोशिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी बँकेचे सहायक महाप्रबंधक राजेंद्र कुलकर्णी, व्यवस्थापक हेमंत खेर, शिवाजी ढेंगे आदी उपस्थित होते. (फोटो-२००९२०२१-कोल-बँक ऑफ इंडिया)

Web Title: Bank of India's agreement with KDCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.