बँक आॅफ इंडियातर्फे कोल्हापुरात ग्राहकांच्या सेवेसाठी ‘ई-गॅलरी’

By Admin | Updated: November 24, 2014 23:59 IST2014-11-24T23:56:25+5:302014-11-24T23:59:08+5:30

२४ तास सेवा देणारी‘ई-गॅलरी’ कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे सुरू

Bank of India offers 'e-gallery' for customer service in Kolhapur | बँक आॅफ इंडियातर्फे कोल्हापुरात ग्राहकांच्या सेवेसाठी ‘ई-गॅलरी’

बँक आॅफ इंडियातर्फे कोल्हापुरात ग्राहकांच्या सेवेसाठी ‘ई-गॅलरी’

कोल्हापूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रोख पैशाची जोखीम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर खात्रिशीर उपाय व रोख पैशांच्या सुरक्षिततेची हमी म्हणून बँक आॅफ इंडियाने २४ तास सेवा देणारी
‘ई-गॅलरी’ कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर येथे सुरू केली आहे.
बँकेचा शाखाविस्तार व ग्राहकांची वाढती संख्या यामुळे बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी
‘ई-गॅलरी’ची संकल्पना सुरू केली आहे. या गॅलरीत एटीएम मशीन, कॅश भरण्याचे मशीन व पासबुक प्रिंटिंगचे मशीन या सेवा ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलबध करुन दिल्या आहेत. बँकेच्या या ‘ई गॅलरी’मुळे ग्राहकांना बँकेत जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तरी सर्व ग्राहकांनी ‘ई-गॅलरी’चा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bank of India offers 'e-gallery' for customer service in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.