कागलमध्ये बंदला पतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:44+5:302021-05-17T04:22:44+5:30
कागल पोलीस ठाण्याचे भरारी पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात फिरून घराबाहेर येत असलेल्या लोकांना कारवाई करण्याचा इशारा दिला. दिवसभर ...

कागलमध्ये बंदला पतिसाद
कागल पोलीस ठाण्याचे भरारी पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात फिरून घराबाहेर येत असलेल्या लोकांना कारवाई करण्याचा इशारा दिला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतीची कामेही ठप्प होती. कागल शहरात नगरपालिकेच्या वतीने प्रभागनिहाय घरोघरी सर्व्हे केला जात आहे. आजही हे काम सुरू होते. नगरपालिका कर्मचारी आणि शिक्षक ही माहिती संकलन करीत आहेत.
आतापर्यंत 354 रुग्ण
कागल शहरात या दुसऱ्या लाटेत 354 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकशे सत्तावीस बरे झाले आहेत. दोन पंधरा रुग्ण उपचार घेत आहेत. तर बारा जणांचा मृत्यू झाला आहे.
फोटो कॅप्शन
कागल येथे कडकडीत लाॅकडाऊनमध्ये खर्डेकर चौक ते कोल्हापूर वेशीदरम्यान असा शुकशुकाट होता.