शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:22 IST

राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला

मुंबई : कोल्हापूरच्या विशाळगडावरील संरक्षित क्षेत्रामध्ये प्राण्यांचा बळी देण्याच्या जुन्या प्रथेवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, मुंबईच्या उपसंचालकांनी १ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निर्देशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये उपसंचालकांनी उच्च न्यायालयाच्या १९९८ च्या निकालाचा हवाला दिला आहे. या निकालाद्वारे सार्वजनिक ठिकाणी देवी-देवतांच्या नावाने बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.ही याचिका विशाळगडावरील हजरत पीर, लिक रेहान मिरा साहेब दर्गा या ट्रस्टने दाखल केली आहे. हा दर्गा अत्यंत जुना असून येथे हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक भेट देतात, असे ट्रस्टने याचिकेत म्हटले आहे. आजही दोन्ही धर्माचे लोक येथील कबरीची पूजा करतात, असा दावा ट्रस्टने केला आहे.प्राण्यांचा बळी देणे, ही दर्ग्याची अविभाज्य प्रथा आहे. वास्तविकता प्राण्यांचा बळी सार्वजनिक ठिकाणी दिला जात नाही. तर, खासगी मालकीच्या जागेवर दिला जातो, असे याचिकेत म्हटले आहे. कोणत्याही राजाने, हिंदू, मुस्लीम किंवा ब्रिटिशांनीही येथे प्राण्यांचा बळी देण्यास बंदी घालण्याचा विचार केला नाही. येथे प्राण्यांचा बळी देत असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील गरीब लोकांना अन्न मिळते. राज्य सरकारचा हा निर्णय मनमानी व भेदभाव करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या ट्रस्टने केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडHigh Courtउच्च न्यायालय