‘रैनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:12+5:302021-07-01T04:17:12+5:30
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कादंबऱ्यांतून तसेच पुस्तकातून केले जात आहे. गिरीश ...

‘रैनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला
महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचे काम आजही काही कथा, कादंबऱ्यांतून तसेच पुस्तकातून केले जात आहे. गिरीश कुबेरांच्या ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकात कुबेर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत केली आहे. अशा लेखनातून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची बदनामी कदापिही सहन केली जाणार नाही. या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुस्तकावर कायमची बंदी घालण्यात यावी. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली पुस्तके शासनाने ताब्यात घेऊन गिरीश कुबेर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. या निवेदनाच्या प्रति तहसीलदार, पोलीस निरीक्षक भुदरगड यांना देण्यात आल्या आहेत.
या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मानसिंग देसाई, पीडीएसपीचे जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई, विश्वशाहीर परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, प्रविणसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संभाजी चौगुले, कपिल देसाई, सिद्धांत सुपाल, संदीप देसाई, सुनील शिंदे, अवधूत एकल, जयदीप पोवार, सुधाकर देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.