बालिंगा शाळा राज्यात मॉडेल ठरेल : सूर्यवंशी

By Admin | Updated: May 17, 2014 20:16 IST2014-05-17T20:15:59+5:302014-05-17T20:16:35+5:30

कोल्हापूर : विविध शासकीय निधी व लोकवर्गणीतून तयार झालेली बालिंगा प्राथमिक शाळा राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य

Balinga school will be a model in the state: Suryavanshi | बालिंगा शाळा राज्यात मॉडेल ठरेल : सूर्यवंशी

बालिंगा शाळा राज्यात मॉडेल ठरेल : सूर्यवंशी

 

कोल्हापूर : विविध शासकीय निधी व लोकवर्गणीतून तयार झालेली बालिंगा प्राथमिक शाळा राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. बालिंगा (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेला विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची प्रेरणा व माजी पंचायत समिती सदस्य मधुकर जांभळे यांच्या प्रयत्नातून तेरावा वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी, लोकवर्गणीतून शाळा दत्तक घेऊन त्यांनी शाळेचे रूपडे पालटले आहे. शाळेच्या पाच खोल्या आहेत. या खोल्यांना विविध आकर्षक रंगरंगोटी, रंगीत फायबर बेंच, छताचे सिलींग, खोलीत मार्बोनेट फरशी, ग्रीन बोर्ड, प्रोजेक्टरची सोय केली आहे. शाळेचे देखणे मॉडेल कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. विजय सूर्यवंशी म्हणाले, एखाद्या अधिकार्‍याने मनावर घेतल्यानंतर कोणता बदल होऊ शकतो, हे रवी शिवदास यांनी दाखवून दिले असून, जिल्ह्यातील शाळांचे रूपडे याप्रमाणे बदलावे, यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे. मधुकर जांभळे म्हणाले, अधिकारी व ग्रामस्थांनी हातात हात घालून काम केल्यानंतर काय कायापालट होऊ शकतो, हे म्हणजे बालिंगा शाळा आहे. यामध्ये रवी शिवदास यांचे योगदान मोलाचे आहे. प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नितीन माने, शिल्पा पाटील, शिक्षणाधिकारी स्मिता गौड, सरपंच गीता कांबळे, उपसरपंच दशरथ वाडकर, संभाजी माळी, ग्रामविकास अधिकारी हंबीरराव पाटील, दीपक जांभळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Balinga school will be a model in the state: Suryavanshi