शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

HSC Result2024: आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर..!, गवंड्याच्या मुलाचं लख्ख यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 11:57 IST

कोल्हापूर : वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असली तरी पालकांनी त्याला कधीही काम करायला दिले ...

कोल्हापूर : वडील गवंडी काम करतात, आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असली तरी पालकांनी त्याला कधीही काम करायला दिले नाही. आम्ही कष्ट करतो, तू त्याचे टेंशन घेऊ नको, फक्त अभ्यास कर.. हे आई-वडिलांचे शब्द त्याची प्रेरणा ठरले. त्यांच्या कष्टाचे चीज करत बलभीम प्रकाश कोकाटे याने बारावीत ९४.१७ टक्के गुण मिळवले.आर. के. नगर येथे राहणारा बलभीम हा कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील दिवसभर गवंडीकाम करतात. काम असेल तिथे त्यांना जावे लागते. आई गृहिणी आहे. तीदेखील लहान-मोठे काम करून कुटुंबाला हातभार लावते. शिवाय मोठी बहीण आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे त्याची व पालकांच्या कष्टाची जाण बलभीमला लहानपणापासूनच होती. एवढे कष्ट होत असतानाही पालक आपल्याला नोकरी, धंदा करून कमवायला सांगण्याऐवजी अभ्यास करायला सांगतात. आम्ही कष्ट करतो तू अभ्यास कर या वाक्याने त्याला आत्मविश्वास दिला. त्याचे अभ्यासाचे असे काही वेळापत्रक नव्हते. कॉलेजमध्ये प्राध्यापकांचे शिकवणे मन लाऊन ऐकायचे, समजून घ्यायचे आणि घरी त्याचे रिविजन करायचे हा त्याचा दिनक्रम असायचा. रात्रंदिवस जागून असा काही त्याने अभ्यास केला नाही. पण ज्यावेळी अभ्यास करायचा तेंव्हा मन एकाग्र ठेऊन करायचा. त्याला पुढे सीए व्हायचे आहे. त्यासाठी त्याचे फाउंडेशनचे क्लासेस सुरू आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC Exam Resultबारावी निकाल