बाळासाहेब भोपळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:42+5:302021-08-20T04:28:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी : बाळासाहेब भोपळे यांनी चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत खानापुरात अनेक विकासकामे केली आहेत. तळागाळातील ...

बाळासाहेब भोपळे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी :
बाळासाहेब भोपळे यांनी चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत खानापुरात अनेक विकासकामे केली आहेत. तळागाळातील घटकापर्यंत त्यांनी सर्व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे सामाजिक कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी जि.प. सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी काढले. खानापूर (ता. भुदरगड) येथे बाळासाहेब भोपळे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमप्रसंगी आबिटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी विष्णू पाटील होते.
यावेळी बाळासाहेब भोपळे यांचा प्रा. अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानसिंग दबडे, अशोक वारके यांनी मनोगते व्यक्त केले. या शिबिरात ५१ युवकांनी रक्तदान करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवराज नाईक यांनी केले.
यावेळी सरपंच शोभा गुरव, उपसरपंच राजेंद्र पाटील, सदस्य अमर भोपळे, संदीप गुरव, शीलाताई घरपणकर, वैष्णवी कांबळे, ग्रामसेवक श्रीकृष्ण कांबळे, नंदा भोपळे, कृष्णात गुरव, संभाजी घरपणकर आदी उपस्थित होते. योगेश गुरव यांनी आभार मानले.
१९ खानापूर भोपळे वाढदिवस
फोटो ओळ : खानापूर ( ता. भुदरगड ) येथे रक्तदान शिबिरप्रसंगी प्रा. अर्जुन आबिटकर, बाळासाहेब भोपळे, शोभा गुरव, राजेंद्र पाटील, मानसिंग दबडे, धीरज भोपळे आदी.