शिल्लक : शाहू समाधिस्थळ परिसराकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:17+5:302020-12-07T04:17:17+5:30
कोल्हापूर : नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू समाधिस्थळाच्या परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. छाटणी केली नसल्यामुळे परिसरात गवताचे साम्राज्य ...

शिल्लक : शाहू समाधिस्थळ परिसराकडे दुर्लक्ष
कोल्हापूर : नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू समाधिस्थळाच्या परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. छाटणी केली नसल्यामुळे परिसरात गवताचे साम्राज्य झाले आहे. येथे तत्काळ स्वच्छता करावी, गवताची छाटणी करावी, अशी मागणी शाहूप्रेमींतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर महापालिकेने नर्सरी बागेजवळ स्वनिधीतून कोट्यवधी रुपये खर्चून राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले आहे. काही दिवस कोरोनामुळे येथे प्रवेश बंद केला होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या परिसराकडे दुर्लक्ष झाले. स्मारकाच्या डाव्या बाजूला राजघराण्यातील मंदिरे आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई आणि शिवाजी महाराज यांच्या मंदिरांचा समावेश आहे. या मंदिरांना ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरांवर झाडे उगवली असून, ती काढलेली नाहीत. यामुळे मंदिरालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच याच परिसरात चार ते पाच फुटांपर्यंत गवत वाढले असून, त्याची छाटणी केलेली नाही. यामुळे शाहू समाधी स्मारकाच्या सौंदर्यालाही बाधा निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
शाहू समाधी स्मारक परिसर आणि येथील लॉन सुस्थितीत आहे. राजघराण्यातील मंदिर परिसरात मात्र गवत वाढले आहे. मंदिर आणि स्मारक या संपूर्ण परिसराची वार्षिक देखभाल देण्यासाठी प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. सध्या मनुष्यबळ कमी असल्यामुळे परिसराची स्वच्छता करायची राहिली आहे. लवकरच ती करून घेतली जाईल.
रावसाहेब चव्हाण, उपशहर अभियंता, महापालिका.
फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधिस्थळ १
फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधिस्थळ २
ओळी : कोल्हापुरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू समाधिस्थळ येथील मंदिर परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, गवताची छाटणी केली नसल्यामुळे ते चार फुटांवर ते वाढले आहे.
फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधिस्थळ ३
ओळी : कोल्हापुरातील शाहू समाधिस्थळ परिसरातील मंदिरांवर झाडे उगवली आहेत. वेळेवर याची छाटणी केली नाही तर मंदिरालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
छाया : आदित्य वेल्हाळ
बातमीदार : विनोद