बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:45 IST2019-04-04T00:45:26+5:302019-04-04T00:45:32+5:30

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुुरू बाळूमामांचा वार्षिक भंंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविकभक्तांच्या उपस्थितीत पार ...

Balamama Bhandara travel enthusiast | बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात

बाळूमामा भंडारा यात्रा उत्साहात

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुुरू बाळूमामांचा वार्षिक भंंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविकभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. गेले सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांच्या भक्तिमय वातावरणात, भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, ढोल-कैताळांच्या गगनभेदी आवाजात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात श्रीक्षेत्र आदमापूर नगरी भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत भंडारमय झाली.
विविध भागातील कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने, प्रवचने, भजनी मंडळांची भजने, धनगरी ढोल यांच्या निनादात आणि मोठ्या भक्तीमय, उत्साही वातावरणात भंडारा उत्सव झाला. जागरादिवशी रात्री उशिरा भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे बाबूराव डोणे (वाघापूरकर) यांचा चिरंजीव कृष्णात डोणे वाघापुरे यांचा भाकणुकीचा (भविष्यवाणी) कार्यक्रम झाला. धनगरी गाणी, ओव्यांच्या गायनाने भाविकभक्त तल्लीन झाला होता. उत्सवाच्या दुसºया दिवशी महाप्रसादाचा लाभ सुमारे दोन-अडीच लाख भाविकभक्तांनी घेतला.
तिसºया दिवशी सद्गुरू बाळूमामांचा पालखी सोहळा बाळूमामांच्या मंदिरापासून आदमापूर गावातून सकाळी आठ वाजता सुरू झाला. धनगरी ढोलांच्या गगनभेदी निनादाबरोबरच हरीभजन, लेझीम पथके, दांडपट्टा, बाळूमामांच्या अश्वांचा ढोल-कैताळांच्या तालावरचा नयनरम्य नाच, भजन, संकीर्तन, पालखी पूजन, आरती, भंडाºयाची मुक्तहस्ते उधळण यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्याचबरोबर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, आदीसह तरुण व आबालवृद्ध ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात रंगून गेले होते. या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पालखी सोहळ्यात दोन ते तीन क्विंटल भंडाºयाची मुक्तहस्ते उधळण करून आदमापूर नगरीने पिवळं पितांबर परिधान केले होतं.
सकाळी ८ वाजता सुरू झालेला पालखी सोहळा दुपारी दोन वाजता ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या पटांगणावर आला. यावेळी पालखी सोहळ्यातील भक्तांनी एकमेकांच्या अंगावर भंडाºयाची मुक्त हस्ते उधळण केली. रखरखत्या उन्हातदेखील भाविकभक्त भंडाºयाची उधळण करीत होते. बाळूमामांच्या बग्यातील सहा अश्वांचा वाद्यावरील नाच भक्तांचे आकर्षणच ठरले होते. या पालखी सोहळ्यातील सहभागी भक्तांना गावातील विविध तरुण मंडळांनी मोफत अन्नछत्राचे व ताक, सरबताचे आयोजन करून भक्तांचा आशीर्वाद घेतला. यामध्ये सद्गुरू बाळूमामा विकास फौंडेशन, बजरंग उद्योग समूह, बाळूमामा अर्थमुव्हर्स, सोनालिका ट्रॅक्टर डिलर्स व बजरंग चौकात विकास पाटील, हेमंत पाटील, गणेश खेबुडे व तरुण कार्यकर्ते यांंच्यावतीने अन्नछत्राचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी ५.३० वा. गावच्या आडविहिरीवर भंडारा टाकून पुन्हा बाळूमामांच्या मंदिरात पालखी सोहळा दाखल होऊन महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला. बाळूमामांच्या पालखी सोहळ्यात वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, आदी सेवा भक्तांसाठी देवस्थान समितीकडून पुरवण्यात आल्या होत्या. या पालखी सोहळ्याचे नियोजन बाळूमामा देवस्थान समिती व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते. देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, भुदरगड पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, तहसीलदार, प्रांताधिकारी संपत खिलारे, पोलीस यंत्रणा, मराठा कमांडो, व्हाईट आर्मीतील रक्षक, आदमापूर गावासह आसपासच्या गावांतील सेवेकरी तरुण, महिला वर्ग यात्रेसाठी दक्ष होते.
गावातील विविध तरुण मंडळांकडून पाणीपुरवठा करण्यात आला. गावच्या सरपंच नेहा पाटील, उपसरपंच बजरंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक व उद्योगपती दिनकरराव कांबळे, बजरंग उद्योग समूहाचे संस्थापक संभाजीराव भोसले व विविध संस्थांचे कर्मचारी, युवक यांच्या सहकार्याने पालखी सोहळा संपन्न झाला.

Web Title: Balamama Bhandara travel enthusiast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.