बालगोपाल तालीम व पाडळी उपांत्य फेरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:05 IST2021-02-20T05:05:12+5:302021-02-20T05:05:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्यावर सांगरुळ फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल ...

Balagopal Talim and Padli reach the semi-finals | बालगोपाल तालीम व पाडळी उपांत्य फेरीत दाखल

बालगोपाल तालीम व पाडळी उपांत्य फेरीत दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्यावर सांगरुळ फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्धेत बालगोपाल तालीम व पाडळी संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. सामन्याचा आज, शुक्रवारी सहावा दिवस असून उद्या, शनिवारी अंतिम सामने होणार आहेत.

कुंभी कारखान्यावर डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शहरी विभागातून बालगोपाल तालीम फुटबॉल संघाने बावडा एफसी संघावर ४ विरुद्ध ० गोलने एकतर्फी विजय मिळवला. बालगोपाल संघाच्या ऋषीकेश मेथे पाटील व अभिजित साळुंखे यांनी प्रत्येकी २ मैदानी गोल करून बावडा एफसीचा पराभव केला, तर ग्रामीण विभागातून हनुमान पाडळीच्या संघाने कोडोली संघाला १ विरुद्ध ० गोलफरकाने पराभूत केले. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

दुसऱ्या गटातील झालेल्या अन्य सामन्यात बी.जी.एम. स्पोर्ट्स विरुद्ध फुलेवाडी संघादरम्यान झालेला सामना ट्रायब्रेकरवर गेला. यात फुलेवाडी संघाने ४ विरुद्ध ३ गोलफरकाने विजय मिळविला. बाल गोपाल विरुद्ध ए.जी.ग्रुप संघादरम्यान झालेल्या सामन्यात बालगोपालने ५ विरुद्ध १ अशा गोलफरकाने ए.जी. संघाचा पराभव केला. वेताळ तालीम संघाने श्रीराम एफसी संघाला १ विरुद्ध ० गोलने पराभूत केले.

फोटो - बालगोपाल विरुद्ध पाडळी या संघांत झालेल्या सामन्यादरम्यानचा एक अटीतटीचा क्षण.

Web Title: Balagopal Talim and Padli reach the semi-finals