शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

रस्त्यावरील जाहिरात बोर्ड काढण्याच्या कारणावरून बेकरी चालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:24 IST

नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील एसटी स्टँडसमोर असणाऱ्या बेकरी चालकाने रस्त्यावर लावलेले जाहिरात बोर्ड काढताना ...

नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील एसटी स्टँडसमोर असणाऱ्या बेकरी चालकाने रस्त्यावर लावलेले जाहिरात बोर्ड काढताना वडगाव पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी बेकरी चालकाच्या कुटुंबातील सहाजणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा वडगाव पोलिसांनी दाखल केला आहे. रविवार रात्री साडेनऊ वाजता घडलेल्या घटनेची सोमवारी वडगाव पोलिसात नोंद झाली आहे.

वडगावचे पोलीस कॉन्स्टेबल रणवीर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे; वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत कारवाईसाठी गेले होते. परत जात असताना वाठार स्टँड परिसरात तळसंदे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे आढळले. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर लावलेले बेकरी मालाच्या जाहिरातीचे बोर्ड काढण्यास प्रभारी आयपीएस अधिकारी डॉ. बी. धीरजकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. यावेळी संशयित आरोपी दीपक भोपळे, गणेश भोपळे, गणेश भोपळे यांची पत्नी, दोन मुली व अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी सरकारी कामात अडथळा आणून फिर्यादी पोलीस कर्मचारी रणवीर जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. आमचे बोर्ड काढले तर आम्ही आमच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करणार, अशी धमकी दिली. तो स्वतःचे डोके जमिनीवर आपटू लागला. त्यास बाजूला घेतले असता, त्याने आरडाओरडा केला. पालकमंत्री व एसपीकडे जाऊन तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या नोकर्‍या घालवणार, आम्ही गळफास लावून आत्महत्या करणार, अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नजीर खान करीत आहेत. संशयित आरोपी दीपक भोपळे याला पोलिसांनी अटक केली आहे.