शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

डॉक्टर, परिचारिकांचा हलगर्जीपणा; प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच बाळ दगावले, कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:11 IST

१०८ रुग्णवाहिका व डॉक्टर आल्यावर बाळाची नाळ कापली आणि त्यावेळी बाळ दगावले

शिरोली : शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारातच महिलेच्या प्रसुतीनंतर बाळ दगावले. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय बाळाला ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी आणि सरपंच शशिकांत खवरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवसभर घेतला होता.दुपारी चार वाजता जिल्हा परिषदेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर बालकाला नातेवाईकांनी ताब्यात घेतले.

साक्षी सतीश बेडेकर (वय २६, रा. शिरोली माळवाडी, आंबेडकर चौक) या पोटात दुखायला लागल्यावर प्रसूतीसाठी सकाळी ८.४५ वाजता, शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी गाडीतून आल्या होत्या. पण सकाळी ९.३० पर्यंत या महिलेला उपचार मिळाले नाहीत. तब्बल ४५ मिनिटे ही महिला प्रसूतीच्या कळा सोसत आरोग्य केंद्राच्या दारातच थांबून होती. यावेळी नातेवाईकांनी महिलेला उपचार व्हावेत यासाठी धडपड केली.त्यानंतर ९.३० वाजता १०८ रुग्णवाहिका व डॉक्टर आल्यावर बाळाची नाळ कापली. त्यावेळी बाळ दगावले होते. यावेळी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत उपचार केले नसल्याने बाळ दगावले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणून शिरोली पोलीस ठाणे गाठले.

शिरोली सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, जोतिराम पोर्लेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज यांना धारेवर धरत जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारात ठिय्या मांडला. यानंतर जिल्हा परिषदेचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी बाळाला ताब्यात घेतले.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज म्हणाल्या, संबंधित बाळाची वाढ झालेली नव्हती. प्रसूतीसाठी पूर्ण दिवस भरले नव्हते. बाळाच्या मेंदूला आणि किडनीला सूज होती. त्यामुळे बाळ दगावले आहे. दरम्यान, रात्री उशिरा सभापती डॉ. सोनाली पाटील व जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक यांनी दवाखान्याला भेट दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर