शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाबुराव पेंटर यांची कन्या कुमुदिनी बॅनर्जी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:24 IST

कोल्हापूर : भारतीय सिनेसृष्टीत नावीन्याचा मुहूर्तमेढ लावलेले व कोल्हापूरच्या सिनेसृष्टीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ज्येष्ठ कन्या कुमुदिनी बॅनर्जी ...

कोल्हापूर : भारतीय सिनेसृष्टीत नावीन्याचा मुहूर्तमेढ लावलेले व कोल्हापूरच्या सिनेसृष्टीचे जनक कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या ज्येष्ठ कन्या कुमुदिनी बॅनर्जी (वय ९०) यांचे शुक्रवारी पहाटे खरी कॉर्नर येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी प्रिया, विजयमाला, आशा, शशिकला पेंटर या बहिणी असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना आठ अपत्ये. सहा मुली, दाेन मुले. सर्वात मोठे रवींद्र मेस्त्री. त्यांच्यानंतर कुमुदिनी यांचा जन्म झाला. विवाहानंतर त्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाल्या. पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तर मुलगी अमेरिकेत असते. अहमदाबादमध्ये त्यांच्यासोबत बहीण शशिकला राहत होत्या. वय झाल्याने या दोघीही ६ महिन्यांपूर्वी कोल्हापुरात आल्या. तेंव्हापासून चौघी बहिणी एकत्र राहत होत्या. याआधी रवींद्र, अरविंद मेस्त्री व अन्य दोन बहिणींचे निधन झाले आहे. पंचगंगा स्मशानभूमीत कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर