शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिकेतील लाचखोर शाखा अभियंता बबन खोत निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 18:07 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णाजी खोत व त्याचा पंटर किरणकुमार विलास कोकाटे यांना वीस ...

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णाजी खोत व त्याचा पंटर किरणकुमार विलास कोकाटे यांना वीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १६ नोव्हेंबरला रंगेहात पकडले होते. याप्रकरणी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी बबन खोत याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.याबाबत माहिती अशी की, जमिनीचे गुंठेवारी पोटविभागणीच्या प्रलंबित फाईलवर मुख्याधिकाºयांची सही घेवून देतो, असे सांगून तक्रारदाराकडे बबन खोत याने लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदारकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १६ नोव्हेंबरला दोघांना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी लाचलुचपत विभागाने कारवाई करत चौकशी सुरू केली होती.

चौकशीअंती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी खोत याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडील १२ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयानुसार निलंबित करावे, असा आदेश मुख्याधिकाऱ्यांना संदेशाद्वारे दिला आहे. त्यानुसार मुख्याधिकाºयांनी निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या या कारवाईनंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारी