शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा लोकोत्सव : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:45 IST

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा ‘भीमवंदना ’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत ...

ठळक मुद्दे४ एप्रिलला शिवाजी स्टेडियमवर भीमवंदना कार्यक्रम : जिल्हाभर चित्ररथही फिरणार

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा ‘भीमवंदना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि संवेदना सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिलला जयंतीदिनी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोेजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ‘गोकुळ’चे संचालकबाबा देसाई, ‘रिपाइं’(ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष संदीप देसाई, ‘रिपाइं’ (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, ‘रिपाइं’ (कवाडे गट)चे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, लोकजन शक्ती पक्षाचे बाळासाहेब भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आंबेडकर जयंती भव्य दिव्य स्वरूपात आणि रचनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यंदाच्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित ‘भीमवंदना’ हा कार्यक्रम करण्यात येणार आहे. यासाठी ४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता शिवाजी स्टेडियमवर प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड केला जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका वितरित केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण १४ एप्रिलला संपूर्ण देशभर प्रक्षेपित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा.या बैठकीत आंबेडकर यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्याबाबत उत्सव कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी सुभाष देसाई, अनंत खासबागदार, डी. के. कांबळे, रघुनाथ मांढरे, आदी मान्यवरउपस्थित होते.जिल्हाभर चित्ररथ फिरणारडॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य आणि आकर्षक चित्ररथही तयार करण्यात येणार असून हा चित्ररथ जिल्ह्यातील बहुतांशी गावांत फिरविला जाणार आहे. या रथाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर आधारित गीते तसेच त्यांच्या विचारांचा संदेश गावागावांत पोहोचविला जाणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.शाहू-आंबेडकर स्मारकासंदर्भात तोडगा काढूडॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्या शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या जागेवर राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, तसेच स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील