बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रात चुका-विद्यार्थी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:56 IST2018-03-19T23:56:44+5:302018-03-19T23:56:44+5:30

बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्रात चुका-विद्यार्थी संतप्त
कोल्हापूर : एकाच प्रमाणपत्रांवर दोघांची नावे, नावांवरच डिझाईनची छपाई अशा चुका बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी (बी. टेक.) अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवर झाल्याचे दीक्षान्त समारंभाच्या दिवशी सोमवारी निदर्शनास आले. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
परीक्षा भवनच्या परिसरात पदवी प्रमाणपत्रांच्या वितरणाची व्यवस्था विद्यापीठाने विद्याशाखानिहाय स्टॉलद्वारे केली होती. त्यातील ७९ आणि ८० क्रमांकाच्या स्टॉलवर अभियांत्रिकी विद्याशाखेतील बी. टेक. अभ्यासक्रमाच्या पदवीचे वितरण करण्यात येत होते. दीक्षान्त समारंभाचा मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी याठिकाणी पदवी घेण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
पदवीप्रमाणपत्र हातात मिळताच त्यांनी त्यावर नजर टाकली असता. एकाच प्रमाणपत्रांवर दोन विद्यार्थ्यांची नावे, दोन वर्षांचा उल्लेख, पदवीधराच्या नावावरच डिझायनिंगची छपाई, अशा चुका असल्याचेदिसून आले. सुमारे दीडशेहूनअधिक पदवी प्रमाणपत्रांमध्येचुका असल्याचे निदर्शनास
आले.