मुगळी येथे बी. एन. पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:20+5:302021-04-14T04:21:20+5:30
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील बी. एन. पाटील-मुगळीकर व्यापारी संकुलाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. अवधूत सेवा संस्थेने ...

मुगळी येथे बी. एन. पाटील व्यापारी संकुलाचे उद्घाटन
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील बी. एन. पाटील-मुगळीकर व्यापारी संकुलाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. अवधूत सेवा संस्थेने बी. एन. पाटील-मुगळीकर यांच्या स्मरणार्थ हे व्यापारी संकुल उभारले आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्व. पाटील-मुगळीकर यांचे सहकारात चांगले योगदान आहे. त्यांच्या स्मरणार्थ अवधूत संस्थेने बांधलेले व्यापारी संकुल कौतुकास्पद आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यासाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
आमदार राजेश पाटील व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी मुगळीतील न्यू इंग्लिश स्कूलला स्व. मुगळीकर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, उदय जोशी, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जयश्री पाटील, बाबासाहेब पाटील, सरपंच बाळय्या स्वामी, बाळासाहेब हुळ्ळोळी, सुभाष शिरकोळी, नितीन पाटील-मुगळीकर, सचिव गुरगोंडा पाटील, बाळासाहेब महाडिक, शंकर माने, जोती मुसळे, मल्लाप्पा चौगुले, सुरेश धनवडे, अशोक महाडिक, बाबू आरबोळे, आप्पासो पाटील, बाबासाहेब पाटील, रायगोंडा पाटील, प्रकाश माने, गणपती भोसले, बाळू कुंभार, सुभदा जाधव, सविता हुल्लोळी, रंजना भोसले, राजू जाधव आदी उपस्थित होते.
--------------------
*
आठवण फोटोतील..!
मंत्री मुश्रीफ म्हणाले, माझे आणि बी. एन. पाटील-मुगळीकर यांचे ऋणानुबंध होते. जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात ते माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहायचे. त्यावेळी एका कार्यकर्त्याने नूतन इमारतीत मंत्री मुश्रीफ यांच्यासमवेत एका कार्यक्रमातील बी. एन. पाटील-मुगळीकर यांचा फोटो दाखवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
--------------------------
* फोटो ओळी : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे बी. एन. पाटील-मुगळीकर व्यापारी संकुलाच्या नूतन इमारतीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रमांक : १३०४२०२१-गड-०३