‘बी. ई.’ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा निकाल दोन दिवसांत जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:31+5:302021-09-09T04:31:31+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विविध १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केले. त्यात बी. ...

‘बी. ई.’ अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा निकाल दोन दिवसांत जाहीर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विविध १८ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केले. त्यात बी. ई. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्र सात आणि आठ) परीक्षेचा निकाल दोन दिवसांत जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आज, गुरुवारी अभियांत्रिकी महाविद्यालयांना मिळणार आहेत.
परीक्षा मंडळाने एम. ए. फिलॉसॉफी, एम. एस्सी ॲनॅलिटीकल केमिस्ट्री, शुगर टेक्नॉलॉजी, इनऑरगॅनिक केमिस्ट्री (सत्र तीन, चार), बी. ए. ड्रेस मेकिंग अँड फॅशन कोऑर्डिनेशन (सत्र तीन, चार), बी. आर्किटेक्चर (सत्र आठ, दहा), बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (सत्र पाच, सहा), सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच लँग्वेज (सत्र एक, दोन) या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल ऑनलाईन जाहीर केले.
बी. ई. अभ्यासक्रमाची परीक्षा ऑगस्टअखेरीस झाली. त्यानंतर परीक्षा मंडळाला विद्यार्थ्यांचे गुण गेल्या दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले. त्यावर पुढील प्रक्रिया करून निकाल लावण्यात आला. बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझायनिंग, ड्रेस मेकिंग अँड फॅशन कोऑर्डिनेश, बॅचलर ऑफ डिझायनिंग, मास्टर ऑफ व्हॅल्यूएशन, बी. एस्सी., एम. एस्सी (नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी), एम. ए., एम. एस्सी गणित, जिऑग्राफी, बी. टेक (सर्व शाखा), बीसीए., एमसीए., एमएडडब्ल्यू., एमआरएस., एमपीए (म्युझिक)., एम. जे., बी. व्होक या अभ्यासक्रमांची सोमवारी एकूण २८८९ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली.
प्रतिक्रिया
परीक्षा मंडळाने बी. फार्मसी, विधी अभ्यासक्रम (तीन आणि पाच वर्ष) यांच्यापाठोपाठ सोमवारी बी. ई. अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल तत्काळ जाहीर केले. फार्मसी, विधी अभ्यासक्रमांच्या गुणपत्रिका वितरित केल्या. बी. ई. अभ्यासक्रमाच्या गुरुवारी वितरित होतील. वेळेत गुणपत्रिका मिळाल्याने नोकरी आणि परदेशातील पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली मदत होणार आहे.
- गजानन पळसे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ.