डीवायपी मेडिकल कॉलेजमध्ये बी. एस्सी. करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:56+5:302021-09-09T04:28:56+5:30
कसबा बावडा : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोयायटीने स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस हा बी. एस्सी. अभ्यासक्रम गतवर्षी सुरू ...

डीवायपी मेडिकल कॉलेजमध्ये बी. एस्सी. करण्याची संधी
कसबा बावडा : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोयायटीने स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस हा बी. एस्सी. अभ्यासक्रम गतवर्षी सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांचे योग्यप्रकारे शिक्षण सुरू आहे; तर नवीन वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी घडविण्याचे ध्येय ठेवून यू.जी.सी.च्या सीबीसीएसी धोरणानुसार या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, बी.एस्सी. इन मेडिकल रेडिएशन इमेजिंग टेक्नॉलॉजी, बी. एस्सी. इन ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी व बी.एस्सी. इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असे चार अभ्यासक्रम सुरू आहेत. संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती उपलब्ध असून, प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे प्रमुख डॉ. आर. एस. पाटील यांनी केले आहे.