शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘आयुष गार्डन’ : अमन मित्तल, सेवा रुग्णालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:58 IST

‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘आयुष गार्डन’ : अमन मित्तललाईन बझार येथील सेवा रुग्णालयाला भेट

कोल्हापूर : ‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली.लाईन बझार येथील सेवा रुग्णालयातील आयुष निदान व उपचार शिबिराचा प्रारंभ मंगळवारी मित्तल यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक, सेवा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. उमेश कदम उपस्थित होते.अमन मित्तल म्हणाले, सेवा रुग्णालयातील ‘आयुष गार्डन’मध्ये वृक्षांची नावे लिहून त्या वृक्षाच्या औषधी महत्त्वाची माहिती लिहिली आहे. त्यामुळे या वनस्पतींचा नागरिकांत प्रचार व प्रसार होईल.

आयुर्वेदामुळे रोग होण्यापूर्वीच प्राथमिक काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन मिळते. त्यामुळे भविष्यात ‘आयुष’ या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सेवा रुग्णालयात पंचकर्म सुविधा सुरू व्हावी, या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे सांगून मित्तल म्हणाले की, सेवा रुग्णालयात योग शिबिरे आयोजित करण्याचा प्रयत्न व्हावा. ‘आयुष’ उपचाराकडे नागरिकांचा ओढा वाढत असून, या उपक्रमाचा अधिक प्रसार होण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्नशील राहावे.जिल्हा आयुष अधिकारी दादा सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ‘आयुष’च्या डॉ. सारिका पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सुलेखा साळोखे, डॉ. दीपाली देसाई, डॉ. अशपाक मुजावर, डॉ. प्रताप नाळे, डॉ. बी. एस. थोरात, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. राघवेंद्र पोटे, डॉ. डी. जी. तांबिरे, डॉ. चंद्रकांत माने यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नागरिक, महिला आणि रुग्ण उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर