आयेशा सय्यद ठरली ‘मिस गोखले’
By Admin | Updated: January 19, 2015 00:30 IST2015-01-19T00:11:09+5:302015-01-19T00:30:04+5:30
उपविजेती सिद्धी देसाई : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात स्पर्धा

आयेशा सय्यद ठरली ‘मिस गोखले’
कोल्हापूर : गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाचा ‘मिस गोखले’ किताब आयेशा सय्यद हिने पटकावला. सिद्धी देसाई ही उपविजेती ठरली. सेकंड रनरपदी प्रज्ञा धनवडेची निवड झाली. ‘सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती प्रेरणा मंच’च्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना मानाचा ‘मिस गोखले’ किताब, स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रायोजक दत्तात्रय तुकाराम कारेकर सुवर्णपेढीच्यावतीने अनुक्रमे प्रथम विजेतीस सुवर्णालंकार, द्वितीय विजेतीस चांदीचे घड्याळ, तृतीय विजेतीस चांदीचा छल्ला देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, नगरसेविका दीपाली ढोणुक्षे, माजी नगरसेविका आशा महाजन, आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षक म्हणून प्रा. एम. एम. कामत, प्रा. डॉ. एस. एस. लेंढवे, प्रा. डॉ. के. के.पाटोळे, प्रा. एस. एस. गिरी, प्रा. एस. एस. गडदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, कौन्सिल सदस्य दौलत देसाई, अजित मोरे, प्रा. जे. बी. पिष्टे, अंजली देसाई, माधुरी देसाई, संजय कारेकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ऐश्वर्या पोवार व सोनाली कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्या एच. व्ही. भोसले यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)