कांटे, अणुस्कुरा शाळेत किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी जागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:49+5:302021-01-08T05:17:49+5:30
जि. प. सदस्य विजय बोरगे व उमेद फाउंडेशन पुरविणार सॅनिटरी नॅपकिन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सर्वत्र महिला शिक्षण ...

कांटे, अणुस्कुरा शाळेत किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी जागृती कार्यक्रम
जि. प. सदस्य विजय बोरगे व उमेद फाउंडेशन पुरविणार सॅनिटरी नॅपकिन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन सर्वत्र महिला शिक्षण दिन व बालिका दिन म्हणून साजरा होत असताना कांटे, अणुस्कुरा शाळेत किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी खुलताना’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अणुस्कुरा केंद्रातील शाळांमध्ये महिला शिक्षिका कार्यरत नसल्याने किशोरवयीन मुलींना येणाऱ्या समस्या शिक्षकांपर्यंत प्रभावीपणे मांडता येत नव्हत्या. त्यामुळे कांटे, अणुस्कुरा शाळेतील शिक्षकांनी संपूर्ण केंद्रातील किशोरवयीन मुलींसाठी कळी खुलताना उपक्रम सुरू केला आहे. यासाठी मुलींची वयानुसार नोंदणी करून प्रत्येक महिन्याला जि. प. सदस्य विजय बोरगे व उमेद फाउंडेशन यांच्याकडून सॅनिटरी नॅपकिन पुरविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत मुलींना शारीरिक स्वच्छता व मासिक पाळी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक उपकेंद्र कांटेच्या आरोग्य सहायक व्ही. डी. वडर, आशा स्वयंसेविका शोभा चव्हाण यांनी विद्यार्थिंनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले.