गडहिंग्लजमध्ये वाहतूक शिस्तीसाठी जनजागृती मोहीम राबिवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:38+5:302021-01-08T05:21:38+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात वाहतुकीची कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असल्याची ...

Awareness campaign for traffic discipline will be conducted in Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये वाहतूक शिस्तीसाठी जनजागृती मोहीम राबिवणार

गडहिंग्लजमध्ये वाहतूक शिस्तीसाठी जनजागृती मोहीम राबिवणार

गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहरात वाहतुकीची कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जनजागृती मोहीम राबविणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इंगळे म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिन आणि युवक दिनाच्या निमित्ताने सायबर गुन्हे, महिलांसंबंधी आणि वाहनविषयक गुन्ह्यासंदर्भात जानेवारीत संपूर्ण महिनाभर प्रबोधन केले जाणार आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनाही वाहतुकीचे नियम आणि वाहनविषयक कायदे याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकातील नो-पार्किंगमध्ये वाहन पार्क करणाऱ्यांना हेल्मेट, लायन्सन, नंबरप्लेट तसेच विमा नसलेल्या वाहनधारकांना सुरुवातीला गांधीगिरी पद्धतीने प्रबोधन करणार आहे. त्यानंतर सुधारणा न झाल्यास दंडात्मक कारवाई करणार आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सुनील हारूगडे, स्वाती सूर्यवंशी, सागर पाटील आदी उपस्थित होते.

-

* गावोगावी मोहीम

तालुक्यातील काही गावांमध्ये बसथांबेदेखील वाहतुकीसाठी अडथळे बनले आहेत. त्यांची जागा बदलणे गरजेचे आहे. तालुक्यातील पोलीस पाटील यांची मदत घेऊन गावोगावी ही मोहीम राबविणार असल्याचेही इंगळे यांनी सांगितले.

* अशी करणार गांधीगिरी..!

वाहतूक नियम मोडणाऱ्या व बेशिस्तपणे वाहने पार्क करणाºयांना गुलाबाचे फुल देणे, त्यांच्यासमोर ढोल वाजविणे व त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांचे चित्रीकरण करून ते प्रसारित करणे.

* गाडी चालविताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास संबंधिताला ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनच चुकीच्या कृतीबद्दल वाहतूक नियमांची जनजागृती संदेश वदवून घेणे.

--------------------------------------

* गणेश इंगळे : ०४०१२०२१-गड-०६

Web Title: Awareness campaign for traffic discipline will be conducted in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.