सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वापरण्याबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:09+5:302021-04-13T04:24:09+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला. मी मास्क वापरतो, तुम्हीसुद्धा वापरा याच माझ्यासाठी ...

Awareness about the use of masks on the occasion of Satej Patil's birthday | सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वापरण्याबाबत जनजागृती

सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वापरण्याबाबत जनजागृती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला. मी मास्क वापरतो, तुम्हीसुद्धा वापरा याच माझ्यासाठी शुभेच्छा, या त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडिओतून तसेच सोशल मीडियाद्वारे मास्कसह त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर सकाळपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल पन्नास लाख लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचली. याबरोबरच कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकऱ्यांना मास्कचे वाटप केले. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पाटील यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. त्याऐवजी ‘मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा’ याच माझ्यासाठी शुभेच्छा, असे आवाहन करत त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती केली. या आवाहनाला राज्यातील विविध पक्षातील मातब्बर नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्वांनी मास्क घातलेले व्हिडिओ आणि त्यासोबत संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई, वर्षा गायकवाड, खा. सुप्रिया सुळे, खा. राजीव सातव, खा. संजय राऊत, बच्चू कडू, धनंजय मुंडे , नवाब मलिक, आदित्य ठाकरे, उदय सामंत, यशोमती ठाकूर, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, खा. अमोल कोल्हे, खा. श्रीनिवास पाटील, राजेश टोपे, आ. भाई जगताप, जिग्नेश मेवानी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, इम्रान प्रतापगडी, रितेश देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.

पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ लाख मास्क वाटप करण्यात येणार आहेत. कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. साेमवारी शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरात ५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

फोटो : १२ पाटील वाढदिवस

ओळी: सतेज पाटील यांच्या वाढदिनी भाजी विक्रेते आणि कष्टकरी यांना मास्क वाटप करताना युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्ते.

Web Title: Awareness about the use of masks on the occasion of Satej Patil's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.