शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सतेज पाटील यांना प्रमाणपत्र प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 20:04 IST

Satej Patil News : महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कोल्हापूर -  महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 मध्ये बिनविरोध निवडून आलेले उमेदवार सतेज उर्फ बंटी. डी. पाटील (पक्ष- इंडियन नॅशनल काँग्रेस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल(भाप्रसे), निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव जाधव, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणूक 2021 साठी 5 उमेदवारांची 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. यापैकी छाननीत 4 उमेदवारांची 6 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. अमल महादेवराव महाडिक (पक्ष- भारतीय जनता पार्टी), शौमिका अमल महाडिक (अपक्ष)व शशिकांत शामराव खोत (अपक्ष) या 3 उमेदवारांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी  द्विवार्षिक निवडणुकीत सतेज उर्फ बंटी डी. पाटील विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घोषित केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील