शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये ३३ दिवस ३३ व्याख्याने; मुस्लिम अधिकारतर्फे विचारांचा जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:40 IST

दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले.

ठळक मुद्देराज्यभरातील तज्ज्ञांचा सहभागसमाजातील प्रश्नांवर वेबीनार

सांगली : कोरोनामुळे सुरू झालेला लॉकडाऊन व त्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मुस्लिम अधिकार आंदोलनतर्फे गेल्या महिन्याभरापासून वैचारिक मंथन राबविले आहे. झूम अ­ॅपव्दारे ह्यआॅनलाईन अभ्यास वर्गाह्णच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील अडीअडचणी, त्यावरील उपाय व समाजासमोरील आव्हाने यावर राज्यभरातील तज्ज्ञ मंडळी आपले विचार मांडत आहेत. गेल्या ३३ दिवसांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात खासदार हुसेन दलवाई, तुषार गांधी, श्रीमंत कोकाटे आदींनी मार्गदर्शन केले.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे हतबल न होता या कालावधित समाजातील प्रश्नांवर व भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी २२ एप्रिलपासून मुस्लिम अधिकार आंदोलन, महाराष्ट्र या संघटनेमार्फत रोज दुपारी साडेचार वाजता ह्यआॅनलाईन सामाजिक अभ्यास वर्गह्ण सुरू करण्यात आला होता. झूम अ‍ॅपद्वारे हे वेबीनार होत असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक यात सहभागी होत होते. सुहेल सय्यद, जिशान पटेल, रमीज मणेर, सरताज तांबोळी व मुनीर मुल्ला याांनी या अभ्यास वर्गाचे संयोजन केले.

३३ दिवस चाललेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होत आपले विचार मांडले. यात मुस्लिमांची सामाजिक स्थिती व राजकारण (खासदार हुसेन दलवाई), हिंदू-मुस्लिम ऐक्य व सर्वधर्मसमभाव (तुषार गांधी), विषमतेविरुद्ध इस्लामचा विद्रोह (कॉम्रेड धनाजी गुरव), भारतीय मुस्लिम समज-गैरसमज व अपेक्षा (श्रीमंत कोकाटे), भारतीय मुस्लिमांची सत्यपरिस्थिती व त्यांचा इतिहास (सरफराज अहमद), सच्चर रिपोर्ट व भारतीय मुसलमानांचे प्रश्न (सुभाष वारे),भारतीय मुस्लिम सुफी संतांची सामाजिक चळवळ (जावेद पाशा कुरेशी), समाज व्यवस्थेसाठी मोहंमद पैगंबर यांचे योगदान (डॉ. सुहास फडतरे महाराज (कीर्तनकार), दहावी, बारावीनंतर पुढे काय? (प्रा. डॉ. के. जी.पठाण), सद्य परिस्थितीतील आव्हाने व मुस्लिम तरुण (डॉ. सूरज चौगुले), मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्या व त्यावरील उपाय. (माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण) आदींनी आपले विचार मांडले.

 

मुस्लिम समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. भविष्यातील बदलत्या घडामोडींबरोबरच येणाºया आव्हानांचा सामना करण्यासाठी वैचारिक मंथन आवश्यक होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय ज्येष्ठ तज्ज्ञांच्या सहभागामुळे वेबीनारचा उद्देश सफल झाला आहे.मुनीर मुल्ला, अध्यक्ष मुस्लिम अधिकार आंदोलन  

टॅग्स :Muslimमुस्लीमkolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन