शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

महामंडळांना ठोकले टाळे

By admin | Updated: January 3, 2015 00:11 IST

निधीची मागणी : ‘लोकमत’च्या मालिकेचा प्रभाव; बहुजन परिवर्तन पार्टीचा भव्य मोर्चा

कोल्हापूर : बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज, शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले व संत रोहिदास चर्मकार मागासवर्गीय महामंडळांना टाळे ठोकले़ महामंडळांना निधी न दिल्याच्या निषेधार्थ हे टाळे ठोकण्यात आले़ महामंडळांना निधी प्राप्त होत नाही तोपर्यंत कार्यालये उघडू न देण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या राज्याध्यक्षा मनीषा नाईक यांनी दिला़ ‘लोकमत’ने मागासवर्गीय महामंडळाच्या आर्थिक दुरवस्थेबाबत नोव्हेंबरमध्ये चार भागांची मालिका प्रकाशित केली होती़ टाउन हॉल येथून दुपारी दीड वाजता मोर्चाला प्रारंभ झाला़ मागासवर्गीय महामंडळांना निधी मिळालाच पाहिजे, मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ झाली पाहिजेत, अशा घोषणा देत हा मोर्चा दाभोळकर कॉर्नर येथे आला़ या मोर्चात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर येथे सुमारे तासभर ठिय्या मांडला़ त्यामुळे महामार्गापासून आंबेवाडीपर्यंतची वाहतूक खोळंबली़ ही घटना समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी येऊन बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक यांना ‘रास्ता रोको’ थांबविण्यास सांगितले़ त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये हा मोर्चा विचारे माळ येथील सामाजिक न्यायसंकुलाच्या प्रवेशद्वारावर थडकला़ या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी मागासवर्गीय महामंडळाच्या कार्यालयास टाळे लावण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला़; पण पोलिसांनी त्यांना अडविले़ प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा फौजपाटा तैनात केला़ त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते़ कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ शेवटी पोलीस बंदोबस्तामध्ये संघटनेचे बाजीराव नाईक, मनीषा नाईक, नानीबाई हेगडे, आक्काताई पांढरे, आदींनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळांना टाळे ठोकले़ या मोर्चात संघटनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार चौगले, कोल्हापूर शहराध्यक्ष संजय भोसले, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माया पांढरबळे, रत्नाबाई साठे,, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़ पोलिसांची धावपळ मोर्चाला एवढ्या मोठ्या संख्येने महिला जमतील, याचा अंदाज पोलीस प्रशासनाला अन् महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आला नाही़ दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलकांनी ठिय्या मांडल्यानंतर सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली अन् पोलीस अधिकारी खडबडून जागे झाले़ दरम्यान, कार्यालयास टाळे लावल्यानंतर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता महामंडळाच्या व्यवस्थापकांचे फोन ‘डायव्हर्ट मोड’वर होते़ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील बीजभांडवल आणि अनुदान योजनेतील मंजूर लाभार्थ्यांसाठी ७३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे़ त्याचे वाटप पुढील आठवड्यात होणार आहे. - दीपक खुडे, विभागीय व्यवस्थापक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ