‘एव्हीएच’ हद्दपार करणारच

By Admin | Updated: March 13, 2015 23:55 IST2015-03-13T23:39:32+5:302015-03-13T23:55:06+5:30

भरमू पाटील : कार्यकर्त्यांसह विधानसभेवर धडक मारणार

The 'AvH' will be deported | ‘एव्हीएच’ हद्दपार करणारच

‘एव्हीएच’ हद्दपार करणारच

चंदगड : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीतील ‘एव्हीएच केमिकल्स’ हा प्रकल्प तालुक्यातील जनतेच्या आरोग्य व पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह विधानसभेवर धडक मारणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी पाटणे फाटा येथे पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी होते.भरमूअण्णा म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. या प्रकल्पाची बाजू जनतेसमोर यावी, म्हणून तत्कालीन राज्यमंत्री सतेज पाटील यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानुसार ९ जानेवारी २०१३ला प्रशासन, कंपनीचे अधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात झाली होती. मात्र, आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने पुढील बैठका थांबल्या. विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात यशवंतनगर येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांनी ‘एव्हीएच’ चंदगडमधून घालवणारच, असे ठाम आश्वासन दिले होते. परंतु, कृती काहीही झाली नाही. मी कार्यकर्त्यांसह केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन हा तालुक्याच्या मुळावर उठलेला प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली होती. यावेळी उपसभापती शांताराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट, माजी सभापती यशवंत सोनार, सरपंच सचिन बल्लाळ, सरपंच वसंत चव्हाण, बाबूराव जाधव, पंचायत समिती सदस्य बबनराव देसाई, सदानंद चंदगडकर, गणपत नाडगौडा, आर. जी. पाटील, आदी उपस्थित होते.

सर्वांनी एकत्र यावे
चंदगड तालुक्यात ‘एव्हीएच’ प्रकल्प कोणी आणला, कोणत्या परिस्थितीमध्ये आणला, तो आणताना कोणकोणत्या घडामोडी घडल्या, याविषयी आता चर्चा करणे योग्य नाही. हा मुद्दाही आता महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा ‘एव्हीएच’ प्रकल्प हा तालुक्याच्यादृष्टीने घातक आहे, तो हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: The 'AvH' will be deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.