शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल हमीभावात सरासरी दोनशेची वाढ--शेतकºयांना दिलासा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे.

ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास बाजार समिती कारवाई करणारतो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क  सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे. सोयाबीन क्विंटलला २७५ रुपये, भुईमूग २३०, सूर्यफूल ३५०, तूर ४००, तर मुगाला ३५० रुपयांची वाढ झाली आहे. आता सोयाबीन ३०५० रुपये, भुईमूग ४४५०, तर ज्वारी १७२५ रुपये क्विंटलने खरेदी केली जाईल. शेतीमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापाºयांवर कारवाई करण्याचा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बुधवारी दिला.

दरवर्षी खरीप हंगामापूर्वी केंद्र शासनाकडून पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाते. मागील काही दिवसांपासून महागाईत वाढ होऊ लागली आहे. महागाई वाढत असताना, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. प्रत्येकवर्षी किमान हमीभावात वाढ होते, मात्र उत्पादन आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता २०१७-१८ या वर्षासाठी शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीत सरासरी दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गतवर्षी सोयाबीनसाठी २७०० रुपयांचा भाव होता, यंदा त्यामध्ये २७५ रुपयांची वाढ होऊन ३०५० रुपये करण्यात आला आहे. भुईमुगात २३० रुपयांची वाढ होऊन, तो ४२५० रुपयांवरुन ४४५० रुपये क्विंटल झाला. तूर आणि उदडाचा भाव चारशे रुपयांनी वाढला. तूर ५०५० रुपयांवरुन ५४५० रुपये, उडीद पाच हजारावरुन ५४०० रुपये, तसेच मुगाच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मूग ५२२५ रुपयांवरुन ५५७५ रुपये क्विंटल झाला. कापसामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाली.

मध्यम स्टेपल कापूस ३७५० ऐवजी ४०२० रुपये, तर लांब स्टेपल कापूस ४०५० ऐवजी ४३२० रुपयांनी खरेदी करावा लागणार आहे. बाजरीत क्विंटलला ९५ रुपयांची वाढ झाल्याने ती १३३० रुपयांवरुन १४२५ रुपये झाली. ज्वारी १६५० रुपयांवरुन १७२५ रुपये, हायब्रीड १६२५ वरुन १७०० रुपये, मका १३६५ वरुन १४२५ रुपये, तर बाजरीला १३३० रुपयांवरून १४२५ रुपये क्विंटल हमीभाव झाला आहे.गव्हाच्या हमीभावात १७५ रुपयांची वाढ झाली. १४५० रुपयांवरून १६२५ रुपये झाला. तिळाच्याा हमीभावात तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली. ४६०० रुपयाऐवजी ५३०० रुपये तसेच सूर्यफुलाच्या दरात साडेतीनशे रुपयांनी वाढ झाली असून, ३७५० ऐवजी ४१०० रुपये क्विंटल आधारभूत किंमत झाली आहे. केंद्र सरकारने शेतमालाचा हमीभाव निश्चित केला असून, तो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

शेतमाल कमी दराने खरेदी केल्यास बाजार समितीच्यावतीने महाराष्टÑ कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती शेजाळ आणि सचिव पी. एस. पाटील यांनी दिला आहे. बाजार समिती मुख्य आवार, दुय्यम आवार, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत येथील अडते, खरेदीदार, व्यापाºयांना परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.