भंडारा येथे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांना ‘अवनि’तर्फे श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST2021-01-13T04:57:58+5:302021-01-13T04:57:58+5:30

कोल्हापूर : भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, त्यांना रविवारी ‘अवनि’ संस्थेच्यावतीने बिंदू चौकात ...

Avani pays homage to Chimukalya who died at Bhandara | भंडारा येथे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांना ‘अवनि’तर्फे श्रध्दांजली

भंडारा येथे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांना ‘अवनि’तर्फे श्रध्दांजली

कोल्हापूर : भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला, त्यांना रविवारी ‘अवनि’ संस्थेच्यावतीने बिंदू चौकात मेणबत्या पेटवून श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी ‘अवनि’च्या अनुराधा भोसले म्हणाल्या, भंडारा येथील घटना अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये गमावलेल्या बालकांच्या पालकांना सावरण्यासाठी धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करत आहोत.

माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉ. मंजुळा पिशवीकर, आदर्श प्रशालाचे मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, उज्ज्वल नागेशकर, गणी आजरेकर, अर्चना जगतकर, अमृता ढोकणे, वनीता कांबळे, जयश्री कांबळे, शिवकिरण पेटकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या बालकांना अवनितर्फे रविवारी सायंकाळी बिंदू चौकात मेणबत्ती पेटवूून श्रध्दांजली वाहण्यात आली. (फाेटो-१००१२०२१-कोल-बिंदू चौक)

Web Title: Avani pays homage to Chimukalya who died at Bhandara