रिक्षाचालकांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST2021-05-09T04:23:51+5:302021-05-09T04:23:51+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी १,५०० रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालय संगणक ...

रिक्षाचालकांनी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी १,५०० रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. त्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालय संगणक प्रणाली विकसित करत आहे. त्याकरिता रिक्षाचालकांनी आपले बँक खाते आधार कार्ड क्रमांकाशी त्वरित जोडावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी केले आहे.
सरकारने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेले १,५०० रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी आधारकार्ड क्रमांक बँक खात्याशी जोडून घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत या अनुदानासाठी परिवहन आयुक्त कार्यालय संगणक प्रणाली विकसित करत आहे. त्याद्वारे सानुग्रह अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबतची माहिती परिवहन खात्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. याची नोंद रिक्षाचालकांनी घ्यावी, असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. अल्वारीस यांनी केले आहे.